Tuesday, September 14, 2021

अभिनयाची तंत्रे

काल अनिकेत विश्वासराव ह्याची विक्रम गोखले ह्यांनी घेतलेली मुलाखत1 कुतूहल म्हणून पाहिली. विक्रम गोखले ह्यांना मुलाखत देताना  अनिकेतवर दबाव आलेला दिसत होता. आपले वडील श्री. शेखर विश्वासराव ह्यांची पार्श्वभूमी अनिकेतने सांगणे अपेक्षित होते; ती तशी त्याने सांगितली. श्री. शेखर विश्वासराव ह्यांनी दिग्दर्शित केलेल्या दोन नाटुकल्यांमध्ये काम करण्याची संधी मला शालेय जीवनात मिळालेली आहे. तालमीच्या वेळी शिस्त पाळण्याविषयी त्यांचा कटाक्ष असे.

विक्रम गोखले ह्यांनी चरित्रकार म्हणून विशेष प्रसिद्ध असलेल्या रोनाल्ड हेमन2 ह्या 543703887.0.m.1ब्रिटिश नाटककार आणि समी़क्षकाच्या एका पुस्तकाचा उल्लेख केला. 'टेकनिक्स अव अॅक्टिंग' हे त्याचे नाव. रोनाल्ड हेमनने लिहिलेली चरित्रे मी वाचलेली नाहीत पण त्याने केलेले समीक्षात्मक लेखन वाचलेले आहे. त्यामुळे रोनाल्ड हेमन हे नाव ऐकल्यावर मी कान टवकारले. '41LgD7YPMuL._SX331_BO1,204,203,200_हाउ टू रीड अ प्ले' असेही त्याचे एक गाजलेले पुस्तक आहे.

अभिनयाची तंत्रे शिकण्यासाठी तशी स्तानिस्लावस्कीची3 चार पुस्तके आहेत. पण  पुस्तके वाचून अभिनय थोडाच शिकता येतो?

Stanislavsky प्रणाली4 म्हणजे काय हे थोडक्यात जाणून घेण्यासाठी हे संकेतस्थळ पाहावे. `अभिनय’ ह्या विषयावरील मराठी विश्वकोशातील नोंदही5 लक्षणीय आहे.

संदर्भ :

1. https://www.youtube.com/watch?v=oCe0dFKjMXU

2. https://en.wikipedia.org/wiki/Ronald_Hayman

3. https://en.wikipedia.org/wiki/Konstantin_Stanislavski 

4. https://mr.eferrit.com/stanislavsky-%E0%A4%AA%E0%A5%8D%E0%A4%B0%E0%A4%A3%E0%A4%BE%E0%A4%B2%E0%A5%80/

5. https://vishwakosh.marathi.gov.in/26240/